‘अभियंता दिन’ व ‘ऑलम्पस २ के २२’ च्या निमित्ताने स्वेरीत २०१ विद्यार्थ्यांनी केले ऐच्छीक रक्तदान
पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपुर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित इंजिनिअरिंग व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रौप्य महोत्सवी वर्ष, अभियंता दिन व ‘ऑलम्पस २ के २२’ च्या निमित्ताने आयोजिलेल्या रक्तदान शिबीरात पदवी अभियांत्रिकीच्या जवळपास २०१ विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐच्छीक रक्तदान केले.
कोणताही शैक्षणिक कार्यक्रम असो अथवा सामाजिक यात स्वेरी अनेक विधायक उपक्रम राबवित असते. स्वेरी अंतर्गत असलेल्या पदवी अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजनेअतर्गंत ‘अभियंता दिन’ व ‘ऑलम्पस २ के २२’ च्या निमित्ताने या ऐच्छीक रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेश मठपती व डॉ. सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर राबविण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन नाशिक येथील पॉझीटीव्ह मेटरिंग पंप्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक व सीआयआय महाराष्ट्रचे माजी चेअरमन सुधीर मुतालिक यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तीनही रक्तपेढ्यामध्ये मिळून अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण १३ विद्यार्थिनी व १८८ विद्यार्थी असे मिळून एकूण २०१ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.
यावेळी पंढरपूर ब्लड बँक, पंढरपूर, अक्षय ब्लड सेंटर, सोलापूर व सोलापूर ब्लड बँक, सोलापूर या तीन रक्तपेढयांना पाचारण करण्यात आले होते. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी वर्ग घेत होते. रक्तदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी स्वेरीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.
यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.