सोलापूर प्रतिनिधी
दि.१७ सप्टेंबर,२०२२ रोजी पार्क येथील चार हुतात्मा स्मारकांच्या सान्निध्यात शाहिर लाला वाघमारे यांच्या स्मृतीस्मरणार्थ पुण्यतिथी सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
ब्रिटिशांच्या गुलामगारीतुन भारत मुक्त झालातरीही हैद्राबाद हे संस्थान अजुन विलीन झाले नव्हते निजानशाही जुलमी राजवटीच्या विरोधात पहिला लढा उस्मानाबाद जिल्हातील आळणी तालुक्यात तर दुसरा लढा सोलापुर मधिल ता.बार्शी जवळील धामणगांव येथे झाला.
या लढ्यात नाभिक पुञ शाहिर लाला वाघमारे वयाच्या १७,१८ वर्षी लढ्यात सामिल होवुन सलुन दुकानात कारागीरी करता करता गुप्तपणे स्वांतञसैनिकांना बातम्या पुरविणे.व संध्याकाळी आपल्या शाहिरीने मनात मनात स्वांतञ्याची मशाल पेटवीत असल्यामुळे निजामानाने इनामाचे अमिष दाखवुन फितुराच्या मदतीने पकडुन मातीत पुरले व तहान लागल्यावर लघुशंखा पाजुन हालहाल करुन मारले.अस्या प्रकारे आपल्या प्राणांची बाजी लावुन भारताला स्वांतञ देणारे शाहीर लाला वाघमारे हुतात्मा झाले. यांना मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन.या नाभिक रत्नाचा इतिहास तील गौरवास्पद घटना नाभिक समाजासाठी अभिमानास्पद आहे. आजच्या नविन पिढितील लहान थोर सर्व समाज बांधवाना कळवा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवुन समाज कार्यात हातभार लावावा.या सलाबादप्रमाणे
यंदाही श्री संतसेना नाभिक बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान,सोलापुर तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ,सोलापुर जिल्हाच्या संयुक्त विद्दमानाने प्रदेश कार्याध्यक्ष- मा.श्री. सिद्राम रुद्रार,राज्य प्रदेश महिला प्रमुख: डाॅ.माधुरीताई पारपल्लीवार,प्रदेश संघटक: चंद्रमोळी तम्नुर,राज्य कार्यकारणी सदस्य: प्रकाश जोगिपेठकर,सोलापुर जिल्हाध्यक्ष: मोहन जमदाडे,शहरध्यक्षा: श्रीमती शोभाताई राऊत,वधुवरसुचक मंडळाच्या महिलाध्यक्षा:श्रीमती अलकाताई ताटे,संघटक:राम राऊत,शहर युवक सचिव: गितेंद्र बेनाळकर,संचालक: निळ्ळकंठ हल्लाळ्ळीकर,बेलाटीकर राऊतमामा,पतसंस्था: डी.टि.राऊत,श्रीमती सरस्वती ,व सौ.धनश्री भालेकर यांच्या कार्यक्रमास उपस्थित होते.