पुणे प्रतिनिधी सुभाष मुळे
आज भारताचे पंतप्रधान सन्मा. नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जॉय सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने भांडुप गावातील एम. डी. केणी विद्यालय येथील इयत्ता पहिली ते दहावीतील एकूण २२५ विद्यार्थ्याना किराणा किट व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी या शाळेला सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व द्वीप प्रज्वलनाने झाली.सुरवातीय भाषणात जॉय चे संस्थापक गणेश हिरवे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत हे काम माझे एकट्याचे नसून या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, मदत केली अशा सर्वांचेच आभार मानले.
या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करण्याची संधी संचालक शशिकांत माने यांच्यामुळे जॉय ला मिळाली.जॉय संस्था खास करून महाराष्ट्र राज्यातील वंचित व आदिवासी शाळांतील विद्यार्थ्याना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत असते. भविष्यात आपण कितीही मोठे झालो तरी आपले गुरुजन व शाळेला विसरता कामा नये व दातृत्वाचे काम आपल्याकडून समजासाठी व्हायला हवे असे हिरवे सरांनी सांगितले.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा राज्य शासनाने सेवा पंधरवडा जाहीर केला असून स्थानिक पातळीवर नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा यावेळी होणार असून या संधीचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन यानिमित्ताने भवानजी यांनी उपस्थितांना केले व हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या.
जॉय चे काम छानच आहे असे उपस्थित सर्वांनीच सांगितले व नावाप्रमाणेच हि संस्था वांचिताना सहकार्य करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे जे काम करतेय ते वाखाणण्याजोगे आहे.यावेळी केणी शाळेचे संचालक (सी ई ओ) डॉ. प्रशांत शिंदे वेळातवेळ काढून आपल्या दैनंदिन बिझी शेडूल्ड मधून उपस्थित होते. शाळेचे स्वतःचे मैदान किंवा हॉल नसल्याने शाळेसमोरच राहणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोपटे हे शाळेच्या कार्यक्रमांसाठी नेहमीच त्यांच्याकडील मोकळी जागा उपलब्ध करून देतात म्हणून त्यांचेदेखील यावेळी विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका छाया जाधव तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका प्रोयुषा भोसले यांनी केले.या उपक्रमासाठी प्रतापनगर गणेशोत्सव मंडळ व प्रेमजीभाई पुंजा निसर, सुनील महाडिक, अजित वैद्य, प्रवीण पवार यांनी विशेष सहकार्य केले तर जॉयचे सभासदांनी व देणगीदारानी देखील मदतीसाठी पुढाकार घेतला.उपस्थित सर्वांनीच वंचित विद्यार्थ्याना मदत केल्याबद्दल जॉय संस्थेचे मनापासून आभार मानले.