माळशिरस प्रतिनिधी
माळशिरस मतदारसंघातील येळीव गावचे शेतकरी सुभाष निंबाळकर यांना अचानक शुगरचा त्रास सुरु झाला. त्यांनी सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तपासणी केल्यावर शुगरचा हा त्रास म्युकरमायकोसिसमध्ये रुपांतरीत झाल्याचं समजलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण यावरील शस्त्रक्रियेसाठी १० ते १२ लाख रुपये खर्च येणार होता. तसेच यावरील इंजेक्शनही खूप महागडे आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब काळजीत होते.
त्यांचा मुलगा हर्षदने माळशिरसला आमदार रामभाऊ सातपुते यांच्या जनता दरबारात भेट घेऊन आपली संपूर्ण व्यथा सांगितली. त्याच्या वडिलांच्या आजाराचे स्वरूप लक्षात घेता आमदार रामभाऊ सातपुते यांनी सर्वप्रथम सुभाष निंबाळकर यांना ताबडतोब पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. लगोलग ही खर्चिक शस्त्रक्रिया मोफत करून देण्याचीही व्यवस्था केली. नुकतीच त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सुमारे ११ लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत पार पडली.
*शस्त्रक्रियेनंतर आमदार रामभाऊ सातपुते यांनी स्वतः दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन निंबाळकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आता त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे.*
*रुग्णसेवा ईश्वर सेवा *