वेणुनगर प्रतिनिधी
पंढरपूर येथील श्री विठ्ठल सह.सा. का. लि., वेणूनगरचे मागील २ वर्षापासून थकीत असलेले ऊसबिलाची रक्कम रुपये ३० कोटी बुडतात की, काय असे कारखान्याचे ऊस उत्पादक सभासदामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती.
परंतु कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांचेवर विश्वास दाखवून बंद पडलेला साखर कारखाना अभिजीत (आबा) शिवाय इतर कोणासही चालू होणार नाही, याची सभासदांनी मनात खात्री बाळगून अभिजीत (आबा) पाटील यांचे नेतृत्वाखाली श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे पॅनल मधील सर्व उमेदवारांना निवडूण दिले.
या निवडणूकीच्या प्राचारा दरम्यान अभिजीत (आबा) पाटील यांनी निवडणूकीच्या प्रत्येक सभेमध्ये मागील थकीत ऊसबिलाचे पेमेंट दिल्याशिवाय कारखान्याचे सन २०२२-२३ गळीत हंगामाची मोळी टाकणार नाही, असे अभिवचन दिले होते.
त्या पवित्र वचनामध्ये अधिक सुधारणा करुन सन २०२२-२३ च्या बॉयलर प्रदिपना पुर्वीच ऊसबिल देवून सभासदांचा दाहिदिशास विश्वास संपादन केला आहे. त्याबद्दल रविवार दिनांक ११.०९.२०२२ रोजीच्या मा. संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये अभिजीत (आबा) पाटील यांचा अभिनंदनाचा ठराव पारित केला.
त्यास कारखान्याचे संचालक समाधान वसंतराव काळे यांनी सूचना मांडली व त्यास संचालक दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी अनुमोदन दिले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, प्र. कार्यकारी संचालक, अधिकारी वर्ग, सभासद व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.