पुणे प्रतिनिधी सुभाष मुळे
जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक व पत्रकार गणेश हिरवे यांनी नुकतीच लक्ष्मण राजे ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक व पत्रकार यांना त्यांच्या सोसायटीच्या वाचनालयासाठी काही गोष्टींची पुस्तक भेट दिली.
हिरवे सरांना पुस्तक विनामूल्य भेट देण्याचा छंद असून आजपर्यंत त्यांनी जवळपास साडे तेरा हजारांहून अधिक पुस्तक विविध ग्रंथालये, क्रीडा स्पर्धा, अभ्यांगताना, विविध सण - उत्सवांच्या निमित्ताने भेट दिलेली असून त्यांचे हे कार्य कायमच सुरू असते.जोगेश्वरी पूर्व येथील आर जे एम डी बाल विकास शाळेला देखील पुस्तक भेट देण्यात आली.वाचनाने भाषा सुधारते, अनेक नवनवीन शब्द कळतात. वाचन व लेखन करणे हे चांगले छंद आहेत. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी उत्तरे नुसती पाठ करतात,पण प्रत्यक्षात लिहिताना त्यांच्या अनेक चुका होतात.
स्पेलिंग चुकते,शब्द चुकतात व मार्क्स कापले जातात. उत्तरे पाठांतर करून विद्यार्थी बरोबर बोलून दाखवितात,पण लिखाणाचा नियमित सराव नसल्याने अनेक चुका होतात.वाचन व लिखाणाचा सराव असेल तर आपण अधिक बिनचुकपणे लिहू शकतो असा विश्वास सरांना आहे.तेव्हा नियमितपणे दिवसाकाठी काहीतरी छान वाचायला व लिहायला हवेच.