माळशिरस प्रतिनिधी
आज श्री.शंकर सहकारी साखर कारखाना लि.सदाशिवनगर ता.माळशिरस च्या २०२२-२३ च्या ४९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ.नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील आणि सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकुन करण्यात आला.यानंतर झालेल्या कारखान्याच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, व्हा.चेअरमन,सर्व संचालक,जेष्ठ नेतेमंडळी,सभासद,ऊस उत्पादक,वाहतुकदार तालुक्यातील विविध गावचे सरपंच,उपसरपंच,विविध सह.संस्थांचे पदाधिकारी,कारखान्याचे कार्यकारी संचालक,अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.