मुंबई प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्ण श्री श्रेष्ठ शिक्षक सन्मान सोहळा नुकताच राष्ट्रीय शिक्षक संचेतना उज्जैन,मराठा मंदिर साहित्य शाखा मुंबईच्यावतीने मराठा मंदिर येथे संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष ब्रजकिशोर शर्मा,राष्ट्रीय महासचिव उज्जैन डाॅ.प्रभु चौधरी,त्याचप्रमाणे राष्ट्रीय मुख्य सचिव डाॅ.शहाबुध्दीन शेख,राष्ट्रीय मुख्य कार्यकारी अध्यक्षा सुवर्णा जाधव,मार्गदर्शक डाॅ.हरिसिंह पाल,डाॅ.शैलेंद्र कुमार शर्मा,बाळासाहेब तोरसकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शैक्षणिक,काव्य लेखन,साहित्य व संस्कृती यामधून विद्यार्थी व साहित्य मुल्यांचा विकास करणा-या सन्मानिय "प्रिया प्रवीण मयेकर"यांना हिंदी सप्ताहानिमित्त डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन"श्रेष्ठ शिक्षक अभिनंदनपत्र सन्मानपुर्वक प्रदान करून गौरविण्यात आले.
तसेच माधुरी फालक यांनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तसेच ५सप्टेंबर या दिवशी संपन्न झालेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून"प्रिया मयेकर"यांना जनजागृती सेवा समितीच्यावतीने'सन्मानपत्र'देऊन गौरविण्यात आले.त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.