पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी,पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात एस.के.एन.एस.सी.ओ.ई.(SKNSCOE) कोर्टी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 ऑक्टोबर २०२६ रोजी “इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग मध्ये मशीन लर्निंग चे ॲपप्लिकेशन्स” या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजन करण्यात आले. हे व्याख्यान विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली.
या अतिथी व्याख्यानासाठी एस.के.एन.एस.सी.ओ.ई.चे सहयोगी प्राध्यापक डॉ. उदय फुले हे प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत “मशीन लर्निंग ॲप्लिकेशन्स इन इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग ” या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानामध्ये मशीन लर्निंग ची मूलभूत संकल्पना, त्याचे कार्य आणि विद्युत अभियांत्रिकीतील विविध उपयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्युत भाराचा अंदाज (लोड फॉरेकास्टिंग ), ऊर्जा व्यवस्थापन, स्मार्ट ग्रिड, फौल्ट डिटेकशन , प्रेडिक्टिव्ह मेन्टेनन्स आणि विद्युत उपकरणांच्या कार्यक्षमतेचे निरीक्षण यामध्ये मशीन लर्निंग चा वापर कसा केला जातो, हे विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना ऐ आय आणि इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग यांचा परस्पर संबंध समजून घेण्यास तसेच भविष्यातील तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नवीन कौशल्ये विकसित करण्यास प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमाचे अतिथी व्याख्यान समन्वयक म्हणून प्रा. ए. आर. मासाळ यांनी नियोजन व समन्वय केला. कार्यक्रमाला डॉ. के. शिवशंकर आय ईईई विद्यार्थी शाखा समुपदेश व विद्युत विभागप्रमुख(IEEE Student Branch Counselor and HOD) उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
अतिथी व्याख्यान विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. संशोधन प्रस्ताव लेखनातील बारकावे समजून घेण्यासाठी तसेच संशोधन क्षेत्रात प्रभावीपणे वाटचाल करण्यासाठी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.

