भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक-शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य के. डी. शिंदे होते. तर पालक प्रतिनिधी म्हणून नाना लिंगे आणि प्रशांत माळवदे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य के. डी. शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दररोज एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षकांचे सहकार्य घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांनी जागरूक राहून विद्यार्थी दररोज नियमित अभ्यास करतो की नाही, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय राहिल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
या मेळाव्याच्या आयोजनात व्ही आर लेंडवे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एस ऐवळे यांनी केले, तर एल टी वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्या करिता शिक्षक डी एस येडगे ,
ऐ यू निर्वळ,एस एस देशपांडे , एम जे आयरे, एल टी वाघमारे ,ऐ बी शिंदे, ऐ ऐ तांबोळी, एच बी केदार ,के एम गावडे, पी बी नेहतराव ,के एच भोसले, आर एस माळी ,एस बी लांडगे ,एन एम फुलसागर यांनी सहकार्य केले.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पालक-शिक्षक मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली तसेच पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.

