भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
दुष्काळ जवळ येतो आहे पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असे आवाहन कांदिवली येथील पत्रकार भारत कवितके यांनी एका बैठकीत केले आहे.सध्या पावसाच्या अल्पशा प्रमाणामुळे दुष्काळाची काळी सावली पडताना दिसत आहे.
भविष्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागेल यात तिळमात्र शंका नाही, पाऊस कमी झाल्याने शासन दुष्काळावर मात करण्यासाठी योजना जाहीर करतील पण शासनाच्या विविध योजना वाड्या वाड्या पर्यंत गावा गावापर्यंत पोहोचतील असे सांगता येत नाही, सर्व सामान्य माणूस प्रयत्न करत करत कसा तरी दुष्काळावर मात करेन.पण पशुपक्षी यांचे काय होईल?
चारा पाणी विना पशुचे,तलाव,विहीरीत, पाणवठे ठणठणीत पडल्याने पक्षी पाण्याविना तडफडून मरण पावतील,पशु पक्ष्यांची काळजी घ्यावी, पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था थंड जागेत करावी,कारण दुष्काळाचे भयानक संकट समोर येताना दिसत आहे,भेगाळलेल्या जमिनी , ओसाड माळरान, कोरडे ठणठणीत पाणवठे, हवालदिल झालेला शेतकरी हे सर्व पाहून काळजात चर्र होते.पावसाची पुढल्या पावसाळ्यापर्यंत वाट पाहवी लागणार आहे, सर्व सामान्य माणूस, पशुपक्षी, यांना येणाऱ्या दुष्काळावर मात करावी लागणार आहे,
आवश्यकते नुसार पाण्याचा वापर काटकसरीने करावा, घरापुढे पाणी मारणे,सडा घालणे, वाहने धुणे, सार्वजनिक कार्यक्रमात पाण्याचा वापर काटकसरीने करावा, बांधकामावर पाणी मारणे,यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.असे आवाहन पत्रकार भारत कवितके यांनी केले आहे.

