पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने बुधवार, दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी महाविद्यालयाच्या AC Seminar Hall येथे NSS फेअरवेल कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात मागील वर्षाच्या NSS समितीचा समारोप, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचा सत्कार, समिती सदस्यांचा गौरव आणि नवीन NSS समितीची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजय मुजमुले, विभागीय समन्वयक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी NSS च्या माध्यमातून समाजसेवा, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची भावना जोपासावी, असे प्रतिपादन केले. NSS ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मागील वर्षभरात सामाजिक, पर्यावरण, जनजागृती आणि विविध सेवा उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या NSS स्वयंसेवकांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या समिती सदस्यांना त्यांच्या कार्यानुसार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याच कार्यक्रमात नवीन NSS कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये फुंदे प्रतीक पंढरीनाथ यांची NSS अध्यक्ष, प्रसाद पिसाळ यांची उपाध्यक्ष, विश्वतेज पासले यांची सचिव आणि हर्ष गायकवाड यांची उपसचिव म्हणून निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीने समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी, NSS कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी NSS स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

