सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
६५ वर्षाच्या वृद्ध प्रेयसीने ७० वर्षीय प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. क्षुल्लक वादातून वृद्ध प्रेयसीने प्रियकराचा काटा काढला. प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याचं तपासात उघड झाले.
विशेष म्हणजे ६५ वर्षीय वृद्ध महिलेने प्रियकराच्या हत्येनंतर पुरावे मिटवण्याचाही प्रयत्न केला. परंतु DNA चाचणीतून या खूनाचं गूढ उकळलं आणि पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक केली.
माहितीनुसार, पंढरपूर येथे राहणारी मंगल होनमाने आणि अंबादास खांडेकर यांच्यात प्रेमसंबंध होते. गेली १५-२० वर्ष ते दोघे एकमेकांना ओळखत होते. मंगल होनमाने ६५ वर्षीय तर प्रियकर अंबादास खांडेकर ७० वर्षाचे होते. एका क्षुल्लक कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला. या रागाच्या भरात मंगलने धारदार शस्त्राने अंबादासचा खून केला.
एवढ्यावरच न थांबता मंगलने अंबादासचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मंगलने कोयत्याने अंबादासला संपवले. त्यानंतर मृतदेह जाळून तो ओढत नेऊन विहिरीत टाकला असं तपासात पुढे आल्याचं अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सांगितले.

