सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि फुटबॉल असोसिएशन, सोलापूर यांच्या सहकार्याने आयोजित १९ वर्षांखालील शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा वालचंद कॉलेज, सोलापूर येथे उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत MIT माईर्स विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेज, वाखरी, पंढरपूरच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे संघाने यंदाही आपले वर्चस्व कायम राखले आहे.
स्पर्धेवेळी मुख्य क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड तसेच किरण दस्तूरकर यांची उपस्थिती होती.विजयी संघामध्ये कर्णधार कार्तिक कदम, उपकर्णधार विराज खरसडे, तसेच तन्मय होले, धीरज कदम, ओमकार तिडके, शुभकर गारे, संस्कार मुळे, अविराज काळे, राजवीर खेडकर, कार्तिक ठाकरे, उदय खरात, राजवीर बोरसुरे, प्रवेश महंत, सिद्धार्थ गायकवाड, सम्यक कुलकर्णी, प्रणव शहा, पार्थ पवार आणि प्रिन्स कोळेकर यांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आगामी विभागीय स्पर्धेतही संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
संघाच्या या यशाबद्दल शाळेच्या हेडमिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी आणि प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संघाला क्रीडा शिक्षक प्रविण पिसाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

