पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२६ अंतर्गत ५३ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवल्याबद्दल कुमारी संध्या शिवाजी लोखंडे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
कुमारी संध्या लोखंडे हिने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ५३ किलो वजनी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून गावाचे व परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे आणि मार्गदर्शक विष्णू आप्पा लोखंडे यांच्या हस्ते कुमारी संध्या लोखंडे व तिचे वडील शिवाजी लोखंडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी तिच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्यास उपसरपंच नितीन शिंदे, धोंडीराम भाऊसाहेब सावंत गुरुजी, प्रशांत माळवदे, कापसे साहेब, सौरभ तारळकर, माणिक लोखंडे, लुकमान इनामदार, दत्तू लोखंडे, सहदेव लोखंडे, दादा वाघमारे, जीवन लोखंडे, सचिन लोखंडे, पोपट साठे, सुनील रणदिवे, रोहित लोखंडे, अमर लोखंडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

