*जिद्द चिकाटी मेहनत ध्यास घेतलाच पाहिजे शिवाय आईवडिलांचे खंबीर पाठबळ आणि परमेश्वरी आशिर्वाद यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे आहेत:- सिध्देश्वर भाजीभाकरे
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब येथे श्री चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात प्रत्येक पौर्णिमेला महाआरती आणि महाआरती करकंब येथील समस्त कोष्टी समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे याला करकंब समस्त कोष्टी समाज बांधवांचा उदंड प्रतिसाद मिळत आज ट्रस्टी श्री.व सौ. लता नारायण वासुदेव वास्ते श्री.व.सौ.किर्ती धोंडीराम भाजीभाकरे,श्री.व.सौ.ओकार दुधाणे श्री.व.सौ.रेवती मयुरेश म्हेत्रे श्री.व सौ.वैशाली शिवाजी टकले या उभयतांच्या शुभहस्ते आई चौंडेश्वरी मातेची पूजा आणि महाआरती संपन्न झाली.त्यानंतर आई चौंडेश्वरी मातेचा जप करण्यात आला आणि करकंब येथील कोष्टी समाज बांधव श्री.धोंडीराम भाजीभाकरे यांचा चिरंजीव सिध्देश्वर याला चिपळूण येथे एम.बी.बी.एस.ला एडमिशन मिळाले बद्द्ल समस्त कोष्टी समाज बांधवांच्या वतीने सह्रदय सत्कार करण्यात आला. आणि पुढील काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यावेळी सत्काराला उत्तर देताना म्हटला यश प्राप्त करायचं झाल्यास जिद्द चिकाटी मेहनत,ध्यास घेतलाच पाहिजे शिवाय आईवडिलांचे खंबीर पाठबळ आणि परमेश्वरी आशिर्वाद असेल तर यश निश्चितच मिळते ते यश मला पहिल्याच प्रयत्नात मिळाले असून आपणा सर्वांचे आशीर्वाद सदैव पाठीशी असुद्यात सांगितले.त्यानंतर या पौर्णिमेचे महाप्रसादाचे अन्नदाते ट्रस्टी श्री नारायण वासुदेव वास्ते यांचा ही सत्कार दिलीप टकले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.त्यानंतर सर्व समाजबांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.सुत्रसंचलन आणि आरती आईचे सेवेकरी ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केली.
या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सर्व समस्त तरुण युवकांनी त्यामध्ये ज्ञानेश्वर दुधाणे,चंद्रकांत रसाळ, प्रभाकर रसाळ,जयंत टकले,गणेश दुधाणे, राजेंद्र करपे, बाळासाहेब वास्ते,माऊली मुखरे, संदेश टकले, गणेश वास्ते,खंडू नडे,अक्षय नडे, अभिजित टेके, हरिश्चंद्र वास्ते, संजय बुगड,अनिल वास्ते, अभिजित वास्ते, प्रफुल्ल शिलवंत, प्रशांत वास्ते, सोमनाथ नरखेडकर,प्रशांत वास्ते, शंकर लाटणे, शेखर सांगोलकर,कैवल्य दुधाणे, सोमनाथ नरखेडकर,आदींनी पुढाकार घेऊन यशस्वी केले.

