प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते झाला न्यायमूर्ती अश्विन भोबे यांचा सत्कार.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशल्य गवंडी तेज न्यूज
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात साजरे होणारे विवीध धार्मिक कार्यक्रम, मंदीरातील श्री स्वामी समर्थांची दर्शन व्यवस्था, महिला व पुरूष भक्तांची स्वतंत्र दर्शन रांग, भक्त निवास येथील निवास व्यवस्था, परगावाहून दिंडी व पालखी सोहळ्यासह येणाऱ्या भाविकांची विशेष व्यवस्था या सर्व उपक्रम स्वामी सेवक महेश इंगळे हे अत्यंत शुध्द भावनेने व सेवाभावाने सांभाळत आहेत, त्यामुळे स्वामी दर्शनासह भाविकांची येथे सर्वच बाबतीत उत्तम व्यवस्था होते. ही सर्व व्याप्ती पाहता चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मंदीरातील उपक्रम हे स्वामी भक्तांच्या सोईचे असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमुर्ती अश्विन भोबे यांनी व्यक्त केले.
नुकतेच न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी सपत्निक येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी न्यायमूर्ती अश्विन भोबे यांचा सपत्निक श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी न्यायमूर्ती अश्विन भोबे बोलत होते.
पुढे बोलताना न्यायमूर्ती अश्विन भोबे म्हणाले की श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे आमचे मुख्य श्रद्धा स्थान आहे. आमच्या या श्रद्धा स्थानवरील चेअरमन महेश इंगळे व त्यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांची सेवा पाहून कौतुक वाटत असल्याचे मनोगत ही व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या समवेत अक्कलकोटचे न्यायाधीश मुकुल कल्याणकर, न्यायालयाचे स्वप्नील मोरे, बाहेरमठ पोलीस उपनिरीक्षक रणवरे आदीं सहकारी उपस्थित होते.

