पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक,ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी उर्फ नाना यांच्या ९५ व्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी पंढरपूर तालुका अध्यक्ष यांनी त्यांच्या जीवनातील विविध घटना,प्रसंग सांगितले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, जिल्हा सचिव,सुहास निकते,तालुका सचिव महेश भोसले, सदस्य सतिश निपाणकर इ. उपस्थित होते.
तसेच २५ सप्टेंबर फार्मासिस्ट/केमिस्ट डे निमित्त *प्रसिद्ध फार्मासिस्ट विनय उपाध्ये व सुहास निकते यांचा पंढरपूर तालुक्यातर्फे अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, तालुका सचिव महेश भोसले,सदस्य सतीश निपाणकर यांनी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

