पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
दिनांक 24 रोजी गुरुवारी शिवरत्न तरुण मंडळाच्या वतीने आयोजीत केलेल्या बालरोग शिबिरात 57 लहान मुलांची तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक .ज्योतिराम बोंगे यांचे हस्ते करण्यात आले.31 मुले व 26 मुलींची तपासणी करण्यात आली
या शिबिरात काही मुलांना उपचार करण्यात आले या शिबिरात डॉ प्रतापसिंह शिवाजीराव घागडे यांनी मोलाचे मार्गदर्शन व तपासणी केली. उपस्थित पालकांना मुलांच्या आरोग्या विषयी चे मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. ग्रामीण भागातील मौजे देगाव पंढरपूर तालुका
या ठिकाणी हे वैद्यकीय शिबिर घेण्यात आले होते या शिबिरास् गावातील शहाजी पाटील हिरालाल भाई गुरुजी बंगाळे गुरुजी व जिल्हा प्राथमिक शाळेतील गुरुजनांचा सहभाग मिळाला. बाल संगोपन या विषयांवर डॉ घाडगे यांनी पालकांना सूचना दिल्या.नितीन पाटील हिंदुराव पाटील अन्य मंडळाचे सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.शेवटी डॉ श्रीकांत जगन्नाथ खटावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.घाडगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे पार्वती साळुंखे सिस्टर तेजस कोरके रोहित भोसले हे उपस्थित होते.

