मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबईतील वाढत्या काँक्रिटीकरण आणि मोकळ्या जागांच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर, ग्लोबल पेरेंट्स टीचर्स असोसिएशन तर्फे आज बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे एक महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष रोहित दंडवते यांनी सांगितले की, DCPR २०३४ च्या नियम ३८ मधील त्रुटीमुळे अनेक खाजगी शाळा स्वतःच्या जागेत ४०% क्रीडांगण न दाखवताच बाजूच्या BMC च्या बागेची जागा "तात्पुरती" दाखवून भोगवटा दाखला घेत आहेत.
मुख्य आरोप:
1. विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात : शाळा स्वतःचे मैदान भाड्याने देऊन विद्यार्थ्यांना BMC च्या मैदानात पाठवतात. तिथे वॉचमन ठेवून स्थानिक मुलांना प्रवेश नाकारला जातो.
2. सार्वजनिक बागांचे नुकसान : शाळांद्वारे बागांमध्ये काँक्रिटीकरण केले जात आहे. कपोल विद्यानिधी स्कूल, कांदिवली येथे अशी कारवाई झाल्याचे उदाहरण आहे.
3. पैशासाठी मैदानाचा वापर : BMC च्या मैदानात समर कॅम्प, क्रिकेट, कराटे कोचिंग घेऊन शाळा स्थानिक मुलांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत आहेत.
आमची मागणी:
BMC ने तात्काळ धोरण लागू करावे की, "कोणत्याही शाळेला परवानगी/OC देताना संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत सलग ४०% क्षेत्र कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी राखीव असणे बंधनकारक असेल. ही जागा सार्वजनिक मालमत्तेवर अवलंबून असता कामा नये."
हा मुद्दा महाराष्ट्र शासन निर्णय दि. ०८.०९.२००६ नुसार देखील बंधनकारक आहे, ज्यात विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी क्रीडांगण अनिवार्य केले आहे.
"मुंबईच्या मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा हवी आहे, भीक मागून नाही. जर 30 दिवसात कार्यवाही झाली नाही तर आम्ही लोकप्रतिनिधी आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठावू" असे श्री. दंडवते म्हणाले.
संपर्क: रोहित दंडवते, अध्यक्ष - GPTA, मो. ९९८७१०४१११

