कणकवली प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
कणकवली तालुक्यातील नागवे या ग्रामीण भागात स्वानंद मित्र मंडळ कार्यरत आहे.समाजसेवक, गावचे सुपुत्र रवी नानचे आणि कुटुंबियांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.त्याच अनुषंगाने नागवे येथील जि.प.पूर्व प्राथमिक शाळा नं.१येथील विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सरस्वती पुजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.याप्रसंगी दहावी, बारावी, पदवीधर गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच या.शाहू महाराज विद्यालय करंजे येथील मतीमंद मुलांनाही ब्लॅंकेट,टाॅवेल आणि खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, स्वानंद मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रवी नानचे, पंचायत समिती सदस्या दिव्या पेडणेकर, सिद्दिकी जाधव, नागवे गावच्या सरपंच सिद्दिकी जाधव,उप सरपंच महेंद्र कुडाळकर,मा.पंस.राजु पेडणेकर समाजसेवक, महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर, पत्रकार, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, विजय ढवण, मुख्याध्यापक चोडणकर सर,क.ना.सा.पंचक्रोशि करंजे शिक्षक गवस सर,या.सरपंच बाळा सावंत समाजसेवक राजू पाटकर, उद्योजक अजय सावंत,सुधाकर मुले, नारायण खर्डेकर या.सरपंच नागवे.दिगंबर नानचे.पुंडलीक नानचे, यशवंत नानचे, चंद्रकांत सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वैभव नानचे, अनुराधा मेस्त्री मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग सत्य प्रकाश सावंत, ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत,विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ महिला पूरुषआदी मान्यवर उपस्थित होते.

