पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील स्टेशन रोड जाधव धर्मशाळा परिसरात ड्रेनेज जाम झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याची माहिती मिळताच लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ.प्रणिताताई भगीरथ भालके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी परिस्थितीची माहिती घेत नगराध्यक्षा यांनी ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेत काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले.
नागरिकांच्या अडचणींवर त्वरित उपाययोजना करून शहरात स्वच्छता व मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषद कटिबद्ध असून, अशा समस्यांवर तत्काळ कार्यवाही करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

