भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
एसटी ची भाडे वाढ झाली पण एसटी स्थानकातील समस्याचे काय? असा प्रश्न मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार भारत कवितके यांनी केला आहे.शुक्रवार दिनांक १७ जुलै २०२६ पासून एसटी ची भाडे वाढ झाली,पण स्थानकातील शौचालय, डांबरीकरण,शेड, पंखे, पाणी व्यवस्था, नियंत्रण कक्षातील निवेदकाचा कर्कश आवाज, स्थानकावर वास्तव्य करणारे भिकारी, गर्दुल्ले, दारुडे, बेवारस अशा अनेक समस्यांना प्रवाशी वर्गाला तोंड द्यावे लागते, शौचालय ठेकेदार तर मनमानी करुन महिला व पुरुष प्रवाशांकडून पैसे वसूल करतात.पंढरपूर च्या अवाढव्य एसटी स्थानकाचे उदाहरण घ्या,येथे प्रवाशांपेक्षा भिकारी, गर्दुल्ले, बेवारस, दारुडे यांनी व्यापलेला असतो.प्रवाशांना बाकावर बसायला जागा नसते.
यावर कोणाचेही नियंत्रण नसते,दुसरे उदाहरण नॅन्सी कॉलनी येथील एसटी स्थानकातील शौचालय चे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत, नळाला पाणी येत नाही, आवारात डांबरी करण नाही, पावसाळ्यात प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो, या बाबत आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी वारंवार बातम्या देऊन याकडे महामंडळाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.काही ठिकाणी उपहार गृह बंद आहेत, नातेपुते येथे रात्री च्या लांब पल्ल्याच्या गाड्या जेवणासाठी थांबतात पण मिसळपाव व चहा शिवाय काही मिळत नाही.
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वर मॉल जवळ गाड्या थांबतात पण किंमती खूपच असल्याने प्रवाशी वर्ग इच्छा असूनही काही विकत घेत नाही.
सोलापूर एसटी स्थानकातील जागा अपुरी असल्याने वाहकांना स्थानकात गाडी लावताना व बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागते,भाडे वाढ झाली पण स्थानकातील या समस्या चे काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

