सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.-४४/स्वा
तरी संबंधित लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित छायांकित प्रती संबंधित तहसील कार्यालय / तलाठी कार्यालयाकडे दोन दिवसांच्या आत जमा कराव्यात,
· आधार कार्ड,
· पॅन कार्ड,
· बँक पासबुक,
· पी.पी.ओ. आदेश असल्यास त्याची प्रत.
सदर माहिती तलाठी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे संकलित करण्यात येत आहे. ज्या स्वातंत्रसैनिक पेन्शनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसहची माहिती अद्याप दिली नाही, त्यांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा तलाठी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अद्ययावत करता येणार नाही व निवृत्तीवेतन जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर (स्वातंत्र्य सैनिक शाखा) दूरध्वनी क्र. ०२१७-२७३१०२० येथे संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

.jpg)
