भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम प्रतिनिधी तेज न्यूज
सातारा वाई येथे मिरग नक्षत्र कवी संमेलन २०२६ मोठ्या उत्साहात संपन्न झाले.के.एस.आय.पब्लिकेशन आणि विद्या निकेतन सामाजिक आणि शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे राज्य स्तरीय कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन, स्मरणिका प्रकाशन, पुरस्कार वितरण सोहळा, कवी संमेलन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आले.व्यासपिठावरील उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांच्या आगळ्या वेगळ्या शृंगारिक लावण्या या लावणी संग्रहाचे व स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.भारत कवितके यांचे हे दहावे पुस्तक आहे.विद्यानिकेतन चे शशिकांत कोंचळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,"संस्था अनुदानित आहे.१४०मुले दत्तक घेतली आहेत, या संस्थेचे कार्य महाराष्ट्र भर आहे,कोरोना काळात अनेक रुग्णांचे प्राण वाचविले आहे."
दुसरे मान्यवर डॉ.श्रीकांत पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की," चटके बसल्या शिवाय लिहीता येत नाही , कवी ला विषयाचे बंधन नसावे.कवीनी शब्दांची पूजा करावी, इतरांची कविता वाचावी चुका आणि शिका,,मृग नक्षत्रात पेरणी ची लगबग सुरू असते,या मिरग नक्षत्र साहित्य संमेलनात साहित्याची पेरणी करावी लागणार आहे, कवी कडे शब्दाचे भांडार असावे.
"संमेलन अध्यक्ष नागनाथ डोलारे म्हणाले," संख्या शास्त्रावर माझा विश्वास आहे, माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो, प्रत्येक शहराला आपले वैयक्तिक महत्व असते,वाई शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, साहित्य संमेलन म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम नसतो, कवी च्या शब्दात क्रांती घडवून आणण्याची ताकद असते,"
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या काळे अंधेरी यांनी माहिती पूर्ण पणे केले.तर कार्यक्रमांचे आयोजन इंगळी सरकार यांनी अतिशय चोखपणे केले होते, यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले, सर्व साहित्यिकांनी दुपारी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला,या साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून साहित्यिक आलेले होते.


