सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्न, " महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ, सोलापूर " यांच्या वतीने के.जी.to पी.जी. मध्ये येणार्या शैक्षणिक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने व "शिक्षण वाचवा देश वाचवा" तसेच TET परीक्षेतून शिक्षकांची मुक्ती या प्रमुख मागणीसाठी सोलापूर येथे दिनांक:12/6/2026 शुक्रवार रोजी सकाळी ठीक:11: 00 वा. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, यांच्या सह सोलापूरच्या जिल्हा परिषद गेट समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र सह सर्व राज्यातील विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, मा. जिल्हाधिकारी मार्फत माजी शिक्षक आमदार भगवान अप्पा साळुंके याच्या बरोबर शिक्षक परिषदेच्या जिल्हा व राज्य पदाधिकारी, प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य संघटन मंत्री कृष्णा हिरेमठ, सोलापूर जिल्हा सचिव विश्वजीत माणिकशेट्टी, शहर सचिव सुरेश पाटील, उपाध्यक्ष रमेश बेडगे, महिला आघाडी अध्यक्षा शुभांगी बुट्टे, राज्य उपाध्यक्षा राजश्री तडकासे, जिल्हा पदाधिकारी रेणूका हिरेमठ, अशोक होळीकट्टी, अरुणा हणमगाव, चितली सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,बालवाडी शिक्षिका, सेविका, पालक व संस्था चालक धरणे आंदोलनात उपस्थित होते.
तसेच प्रश्न संकलन करणे, अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याचे व विभागाचे शिक्षक परिषदेचे प्रमुख पदाधिकारी, शिक्षक महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.


