मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
पत्रकारिता क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेले वाळूज ता. मोहोळ येथील पत्रकार विजयकुमार मोटे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या राज्य कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
विजयकुमार मोटे हे “मोहोळ न्यूज”च्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक विषय आणि सर्वसामान्यांच्या समस्यांना सातत्याने वाचा फोडत आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर राज्य कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी, कल्याणासाठी आणि संघटन मजबुतीसाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीबद्दल विजयकुमार मोटे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत पत्रकारांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ राज्य कार्यकारिणी
अध्यक्ष : डॉ. समीर राजे (Samarth Bharat)
महासचिव : श्री. सुरजकुमार बागडे (Jai Maharashtra)
उपाध्यक्ष : श्री. दीपक चव्हाण (Sudarshan TV)
उपाध्यक्ष : श्री. राजेंद्र पवार (News X)
उपाध्यक्ष : श्री. अरुणकुमार मोटे (Prabhat)
कार्याध्यक्ष : श्री. विक्रम भोर (Kesari)
कोषाध्यक्ष : श्री. विजय मोटे (Mohol News)
राज्य सचिव : श्री. गिरीश वालवी (Akashvani / Vividh Bharati Radio)
जनसंपर्क प्रमुख : श्री. विठ्ठल तांबे (Sakal)
राज्य संघटक : श्री. विजयकुमार हरिश्चंद्रे (The Times of India)
सहाय्यक जनसंपर्क प्रमुख : श्री. सागर पवार (Pudhari / Pudhari News)
सहाय्यक जनसंपर्क प्रमुख : श्री. नवनाथ खिलारे (Times Now Marathi)
सहाय्यक संघटक : श्री. मंगेश फडाले (Aaj Tak / Mumbai Tak)
कार्यालय सचिव : श्री. मोहम्मद मुलाणी (Lokshakti)


