पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय येथे दहावीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्था व प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावर्षीचा दहावी बोर्ड परीक्षेचा सरासरी निकाल 88.88 टक्के लागला आहे.
यामध्ये प्रथम गायत्री भागवत बडवे 98 टक्के, द्वितीय शिवप्रसाद उमेश देवमारे 96.60 टक्के, तृतीय तनिष्का सतीश गाडेकर 94.20 टक्के,तसेचओम शेषनारायण माने 92.40 टक्के, समीक्षा राहुल काटे 91 टक्के, समृद्धी नितीन कचरे 90.60 टक्के, स्वरूप संतोष बारसकर 89.80 टक्के मिळाली.
या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार प्राचार्य डॉ मुंढे यू.आर यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. मुंढे म्हणाले की प्रशालेत केलेल्या विविध सुविधा व विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत यामुळे आमच्या शाळेची उज्वल परंपरा विद्यार्थ्यांनी टिकून ठेवली आहे. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी प्रशालेतील शैक्षणिक सुविधां व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश प्राप्त झाल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमुख्याध्यापक दराडे व्हि.एस,उपप्राचार्य शिंदे ई.जी,पर्यवेक्षक पवार ए. ए., भोसले एम.ए .व सर्व शिक्षक, पालक ,विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितोळे एस.एम यांनी केले.


