पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारातून पंढरपूर पैठण पंढरपूर बससेवा सुरू करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळ पंढरपूर आगार यांचेकडून प्रवाशी व भाविक भक्तांच्या मागणीनुसार विठ्ठल रूक्मिणी व एकनाथ महाराज भाविक भक्तांच्या सोईकरीता पंढरपूरहून नवीन विशेष बससेवा सुरू करण्यात येत आहे. ७ में रोजी बस सेवेचा शुभारंभ व्यवस्थापक योगेश लिंगायत व कौठाळी चे उपसरपंच रामदास नागटिळक यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. पंढरपूर पैठण बस सेवा सुरू करण्यासाठी आ.समाधान आवताडे,मा.आ.प्रशांत परिचारक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.बस शुभारंभ प्रसंगी पंढरपूर आगाराचे प्रमुख अकुंश सलगर,वरिष्ठ लिपिक समाधान मेटकरी,बस स्थानक प्रमुख अंकूश सलगर यांच्या सह बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी तसेच वाहक - चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कौठाळीचे उपसरपंच रामदास नागटिळक यांनी गेले वर्षापासून पंढरपूर पैठण बस सेवा सुरु करण्याची मागणी परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक,आ. समाधान आवताडे,मा.आ.प्रशांत परिचारक यांच्याकडे केली होती.
सदरची बस दैनंदिन पंढरपूर ते पैठण दुपारी २.३० वाजता पंढरपूरहून निघुन ती पैठण येथे रात्री ९.०० वाजता पोहोचेल, तसेच दैनंदिन पैठण ते पंढरपूर सकाळी ०६.३० वाजता बस निघाल्या नंतर पंढरपूर येथे दुपारी १२.३० वाजता पोहोचेल.सदर बस हि पंढरपूर, टेंभुर्णी, करमाळा, पाथर्डी, पैठण या मार्गावररून धावणार आहे.
प्रवाशी बांधवांनी या सेवेचा पुर्णपणे लाभ घ्यावा असे आवाहन राज्य परिवाहन महामंडळ पंढरपूर आगारा मार्फत करण्यात आले.दरम्यान पंढरपूर ते पैठण या मार्गे जाणारी बस सेवा पहिल्यांदाच सुरु केल्याने भाविक व प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


