भारत कवितके प्रतिनिधी मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
कांदिवली पश्चिम येथे भाजपा कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी भाजपा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष व वार्ड क्रमांक २० चे नगरसेवक बाळा तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
बाळा तावडे यांनी याप्रसंगी सावरकर यांच्या कार्याचा गौरव करुन सांगितले की," सावरकर मुळे आज आपण आहोत,प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे सावरकर कवी लेखक सामाजिक कार्यकर्ते, नाटककार, होते.
"तसेच या प्रसंगी जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते, भारत कवितके यांनी सांगितले की," सावरकर हे एक प्रखर हिंदुत्ववादी, देशभक्त, इतिहास कार, नाटककार होते, विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे संपूर्ण नाव,त्यांचा जन्म २८ में १८८३ साली नाशिक जवळील भगूर या गावी झाला,तर त्यांचा मृत्यू मुंबईत २६ फेब्रुवारी १९६६ साली झाला,देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, आणि देशाचे आपण काही तरी देणे लागतो, देशासाठी आपण काही तरी करायलाच पाहिजे.अखंड हिंदूत्व वादी विचार सातत्याने मांडले."
या प्रसंगी बाळा तावडे, भारत कवितके,सतदेव सिंह, संतोष जाधव,आर.एस.वर्मा, भगवान सिंह,रेशमाताई टक्के, तन्वी, रुपाली चाळके प्रविण पाल,व कांदिवली पश्चिम येथील पुरुष व महिला पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

