श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांचे मनोगत
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानला समाज माध्यमांमुळे मोठा वलय प्राप्त झाला आहे. मंदीर समितीच्या वतीने मंदीरात करण्यात आलेल्या सुशोभिकरणाचा व मंदीरातील धार्मिक कार्यक्रमांची समाज माध्यमांद्वारे भाविकांकडून प्रसिध्दी होत आहे. यानिमीत्ताने श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची धार्मिक क्षेत्रात उत्तुंग भरारी असल्याचे मनोगत सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सहकुटूंब भेट देवून
श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सभापती चेतनसिंह केदार व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी सभापती चेतनसिंह केदार बोलत होते. पुढे बोलताना सभापती चेतनसिंह केदार
यांनी मंदीर समितीच्या वतीने भाविकांना देण्यात येणाऱ्या स्वामींच्या विभूतीमध्ये (अंगारा) स्वामी समर्थांची प्रचंड उर्जा असल्याने या विभूतीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या माध्यमातून मंदीर समितीकडून भाविकांना साक्षात स्वामींचे आशिर्वादच देण्यात येत असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे, दिकसंगी, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, महेश मस्कले, श्रीकांत मलवे व अन्य उपस्थित होते.

