अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर तेज न्यूज
अकलूज ता.माळशिरस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रामदास आठवले आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता अकलूज येथील शासकीय विश्राम गृह येथे त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांची विविध विषयांवर चर्चा केली.
त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी पत्रकारांनाही संबोधित केले व विविध विषयांवर सडेतोड उत्तरे दिली.
पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते विजयसिंहजी मोहिते पाटील यांची शिवरत्न बंगला अकलूज येथे सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला एकमेकांबद्दल असणारे प्रेम आपुलकी व मैत्री या गोष्टींवर त्यांनी बराच वेळ चर्चा केली यावेळी उपस्थित माढा लोकसभेचे कार्यक्षम खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी रामदास आठवले यांचा सत्कार केला त्याचबरोबर सामाजिक शैक्षणिक राजकीय विषयांवर बराच वेळ चर्चा चालली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.राजाभाऊ सरवदे,राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, जिल्हा नेते ज्ञानदेव कांबळे पाटील,तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे,धनाजी पवार यांच्यासह माळशिरस तालुक्यातील महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा तसेच माळशिरस तालुका व गाव शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
त्यानंतर आठवले यांनी पॅंथरचे जुने सहकारी व चळवळीतील लढवय्या कार्यकर्ता पी एस गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट दिली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी त्यांनी व औषधोपचारासाठी आर्थिक मदतही केली या भावूक प्रसंगानंतर लोकांच्या मनामध्ये एक आनंदाची व अभिमानाची भावाना निर्माण झाली लोकांच्या तोंडातून रामदास आठवले यांच्या सारखा तळागाळातील जमिनीवर पाया असणारा नेता पुन्हा आंबेडकरी चळवळीत निर्माण होईल असे शक्य नाही अशा भावना निर्माण झाल्या होत्या साहेबांच्या या कृतीमुळे माणसांच्या व कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले यात शंका नाही.


