पुणे विशेष प्रतिनिधी प्रमोद सूर्यवंशी तेज न्यूज
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कला गोविंद शिक्षण प्रसारक मंडळ व पोलिस मित्र संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 10/ 5/2026 रोजी सकाळी 10 वाजता आठवे कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा 2026 पुण्यातील ऊरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय रविंद्र कला मंदिर येथे पार पडला.
कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान म्हणून राष्ट्रपती पोलीस पदक विजेते व अभिनेते, सुप्रसिद्ध कवी सिताराम नरके यांनी भुषविले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सचिव सोपान (बापू) कांचन विश्वस्त महादेव कांचन , राजाराम कांचन जेष्ठ साहित्यिक सुर्यकांत नामुगडे शिक्षण व क्रीडा जि. प . पुणे सदस्य सुरेखा हरगुडे महात्मा गांधी विद्यालय ऊरूळी कांचन या विद्यालयाचे प्राचार्य भरत भोसले कवी संगीतकार सतीश कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. स्वागत गीताचे सादरीकरण साने संगीत क्लासेसचे विद्यार्थ्यांनी केले.
गीता बरोबरच अभंग, गवळण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, मराठी व हिंदी गाणी उत्कृष्ट सादर केली. संस्कृती अंधारे, सोनाली सुकाळ, संकेत खंडागळे, आदित्य लोखंडे, वैष्णवी साळूंखे, आरोही साळूंखे, श्रीशा काकडे, काळूराम जाधव, सुयश घनवट, हर्षद बोबडे, या विद्यार्थ्यांनी गायन वादन संगीत कलेचे उत्कृष्ट सादरीकरण केले म्हणून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित कवींनी स्वरचित रचलेल्या कविता सादर केल्या. कवी संमेलनाचे औचित्य साधून संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवराज साने यांना संगीत रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिवराज साने यांनी व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कार्यक्रम, आरोग्य, हुंडाबंदी असे समाज प्रबोधन करणे लोकगीते,भारूडे, महापुरुषांच्या कार्याचा गीतातून गुणगौरव करून समाज प्रबोधन करण्याचे काम अविरतपणे केले.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे जिल्हाध्यक्ष व पोलिस मित्र संघ महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष सुरेश वाळेकर यांनी केले तर सुत्रसंचलन अँड उमाकांत अदमाने यांनी केले.


