पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भाळवणी येथे सुरू करण्यात आलेल्या“कृपा वेलनेस फिटनेस सेंटर – शाखा भाळवणी क्रमांक २” चा उद्घाटन सोहळयाचे उदघाटन सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या शुभहस्ते पहाटे 5 वा. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी काळे म्हणाले की तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली आणि फिटनेसकडे वळणे आवश्यक आहे. अशा फिटनेस सेंटरमुळे गावातील युवकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन एक निरोगी आणि सक्षम पिढी घडण्यास निश्चितच मदत होईल. असे काळे म्हणाले.
यावेळी पंचायत समिती सदस्य विजय शिंदे, भाळवणी गावचे सरपंच रणजीत जाधव, सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखानाचे संचालक सुनील पाटील, माजी सरपंच दिलीप भानवसे तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



