पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ज्ञानेश्वर भास्कर बोधले यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ३५ होते.
त्यांच्या पाश्चात आई,वडील पत्नी, एक मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे .त्यांच्यावर पंढरपूर येथील भूवैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचे मावस बंधू व पंढरपूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांचे बंधू होत. त्यांच्या निधनाने पंढरपूर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


