मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
जय बजरंग व्यायाम शाळा मंडळ भटवाडी घाटकोपर पश्चिम मुंबई आयोजित भव्य दिव्य हनुमान जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता.सदर महोत्सवानिमित्त सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद , मोफत आरोग्य तपासणी शिबिर, व भजन असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते
सदर कार्यक्रमास स्थानिक नवनिर्वाचित कार्यसम्राज्ञ नगरसेविका सई समीर शिर्के , कार्यसम्राट आमदार श्रीराम कदम यांचे सुपुत्र ओम राम कदम , भारतीय जनता पार्टीचे स्वीकृत नगरसेवक प्रवीण भाई छेडा वार्ड अध्यक्ष दीपक जानकर साहेब, मंडळ अध्यक्ष मनोहर शिंदे , समाजसेवक मनीष साळवे , महिला वार्ड अध्यक्ष संगीताताई वर्पे शिवसेना उबाठा इम्रान भाई शेख निलेश जंगम , शाखाप्रमुख गजानन काकडे , विलास पवार तसेच मनसेचे वॉर्ड अध्यक्ष उमेश लायगुडे तसेच शिवसेना शिंदे गटाचे मा. नगरसेवक साईभक्त दीपक बाबा हांडे , उपविभाग प्रमुख बाबू साळुंखे वार्ड शाखा अध्यक्ष मनोज भोर यांची उपस्थिती लाभली तसेच स्थानिक कार्यसम्राट खासदार यांच्यामार्फत भाविकांना श्री हनुमान चालीसा पुस्तक मोफत वाटप करण्यात आले होते.
जय बजरंग व्यायाम शाळा मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष प्रफुल जाधव, उपाध्यक्ष विनोद पवार, सेक्रेटरी सागर घंगाळे, उप सेक्रेटरी तन्मय खोत, खजिनदार प्रतीक थोरात, उप खजिनदार अजित चव्हाण कार्याध्यक्ष भावेश चव्हाण, प्रमुख सल्लागार राजेंद्र चव्हाण, राजेश चव्हाण, मंगेश गुरव सदर वरील संचालक मंडळ सभासद देणगीदार हितचिंतक विभागातील सर्व भाविक भक्त यांच्या सहकार्याने श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात आनंदात पार पडला.

