येरमाळा प्रतिनिधी तेज न्यूज
येरमाळा येथे येडेश्वरी देवीच्या यात्रे निमित्त भक्तांना ग्राहक समिती तर्फे फळे वाटप करण्यात आले.येरमाळा येथे चैत्र पोर्णिमा दिवशी येडेश्वरी देवी ची यात्रा पार पडली.
ग्राहक समिती येरमाळा जि. धाराशिव येथे येडेश्वरी देवीला येणाऱ्या भक्त जणांना केळीचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रम बद्दल भक्त जनातून आशीर्वाद देऊन सामाजिक उपक्रम चे कौतुक करून आनंद व्यक्त केला.
यापुढे याही पेक्षा चांगला सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे ग्राहक समिती प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड यांनी सांगितले.
तानाजीराव गुंड प्रदेश अध्यक्ष, गणेश बारकूल युवक जिल्हा अध्यक्ष, सतीश बुरगुटे प्रदेश कार्याध्यक्ष, शिवाजी दांगट जिल्हा अध्यक्ष, विष्णू पवार बार्शी ता. अध्यक्ष,किरण गुंड यांचा हस्ते फळांचे वाटप करण्यात आला.
सुहास बारकूल, महादेव बारकूल, वैभव बारकूल, राजेंद्र यादव, हे उपस्थित होते.विनोद यादव, गणेश पवार,भिकाजी थिटे गणेश पवार,प्रितेश बारकूल परशुराम बारकूल इत्यादी नी कार्यक्रम पार पडला.यावेळी पधादिकारी ,कार्यकर्ते , भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

