सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
महात्मा बसवेश्वर यांचे तत्त्वज्ञान नव्या दिशेने विचार करायला भाग पाडते.प्राचार्य नसीमा पठाण महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात जात-पात अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या जातीय व्यवस्थेत सापडलेल्या समाजाला समता. स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यावर आधारित एक नवा समाज व्यवस्थेचा आराखडा मांडला. एवढेच नव्हे तर श्रम हीच प्रतिष्ठा . याला त्यांनी महत्व दिले .आणि श्रमदान तून मिळालेल्या अर्थार्जनाची दासोह ही संकल्पना त्यांनी मांडली. म्हणून बसवेश्वराचे तत्त्वज्ञान आजही नवे दिशेने विचार करायला भाग पाडते.असे मत सोलापूरचे माजी उपमहापौर तसेच माझी प्राचार्य नसीमा पठाण यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त गुरुविद्या प्रतिष्ठान यांनी सोलापूर येथील समृद्धी हॉटेल येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभात बोलताना केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राजश्री तडकासे यांनी केले. सर्व पाहुणे व पुरस्कारारथी यांचे स्वागत व परिचय गुरु विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोशल कॉलेजचे माजी प्राचार्य के. एम. जमादार व संस्थापक अध्यक्ष श्री सोमशेखर भोगडे. गुरुविद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सातलिंग शटगार , माजी अध्यक्ष प्रा प्रभाकर नागणसुरे, उपाध्यक्षा, कार्याध्यक्षा नमिता थिटे, सचिवा श्रीदेवी यळमेली, सिध्देश्वर नंदिध्वज विजयकुमार भोगडे आधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नसिमा पठाण म्हणाले की महात्मा बसवेश्वर यांनी जातीय व्यवस्थेला थारा दिलेले नाही .माणसाची ओळख जन्मावर नाही तर कर्मावर आणि चारित्र्यावर ठरत असतात. त्याने बाराव्या शतकात विविध जाती धर्मातील लोकांचे आंतरजातीय विवाह घडवून आणले. त्यांनी देव, धर्म .समाज .याबाबतचे विचार स्पष्टपणे मांडले .त्यांनी कर्मकांड अंधश्रद्धा याचा निषेध केला. देव देव्हाऱ्यात नसून अंतःकरणात आहे असे ठासून सांगितले. म्हणून महात्मा बसेश्वर म्हणजे आधुनिक क्रांतीचे जनक असे म्हणायला हरकत नाही .असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य के एम जमादार यांनी आपल्या भाषणात म्हणाले की गुरूविद्या प्रतिष्ठानने समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना निवडून त्यांच्यावर शाबासकीची थाप देण्याची उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गुरुविद्या प्रतिष्ठानचे त्यांनी कौतुक केले.आणि सर्व पुरस्कार मिळालेल्या पुरस्करत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी वसुंधरा शर्मा संदीप भंडारे, दत्तात्रय खडतरे, स्वामीनाथ कलशेट्टी यांनी आपले विचार व्यक्त केले
यावेळी बार्शीचे विजय साळुंखे आणि स्वामीनाथ कलशेट्टी यांना बसव रत्न, संदीप भंडारे व भंडारे यांना बसव शरण दांपत्य, वसुंधरा शर्मा कुलकर्णी यांना बसव शरणी. दत्तात्रय खडतरे व कविता खडतरे यांना बसव शरण दांपत्य , क्षितिजा गाताडे यांना बसवभूषण, सुवर्णा धरणे यांना बसव शरणी ,नगमा मोहसीन शेख यांना बसव शरण दांपत्य , निर्मला श्रीमंत दुधनी बसव माता पुरस्कार, शितल चंद्रशेखर वाघमोडे यांना बसव शरण दांपत्य पुरस्काराने सन्मानित करून पाहुण्यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सचिवा श्रीदेवी यळमेली यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहा भोगडे, नितीन भोगडे, शिवलिला भोगडे. उत्तम कुमार वाघमारे, करण गहिलवार. आदनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी बसव भक्तांची मोठी गर्दी केली होती.

