भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वेशी जवळील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पहाटे मंदिराचे पुजारी अर्थव महाजन यांनी उत्सव मूर्तीस अभिषेक केला.सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी पुष्प वृष्टी करण्यात आली.
यावेळी भजनकरी मंडळीनि श्री राम जयराम जय जय राम,रामाचा सेवक जय हनुमानचा गजर केला.यानंतर आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविक,भक्त,महिला यांनी मोठी गर्दी केली होती.

