भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
गुढी पाडवा, पट वाढवा' उपक्रमातंर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भाळवणी येथे इ. पहीली मध्ये नवीन दाखल विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहीली वर्गात नवीन दाखल विदयार्थ्यांचे 'शाळा प्रवेशोत्सव' उपक्रमातंर्गत टोल-ताशांच्या गजरात, लेझीम नृत्यासह पुष्प वर्षाव करत शाळेतील सर्व शिक्षक व वरील वर्गातील विद्यार्थ्यांनी भव्य असे स्वागत केले. शाळेच्या प्रवेशद्वारा पासून वर्गापर्यंत फुगे, पताका आणि फुलांनी सजवण्यात आले होते. शाळेच्या प्रांगणात सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. शाळेच्या प्रांगणात पहिले पाऊल टाकणारे इयत्ता पहिलीतील चिमुकल्यांचे औक्षण करून, गुलाबपुष्प व फुगे देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य विजय शिंदे, सरपंच रणजित जाधव, शाळेचे माजी मुख्याध्यापक इ. बा. मुलाणी गुरुजी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर खरडकर, उपाध्यक्ष सचिन भोसले, नागेश पाटील, अर्जुन गवळी, अनिल गवळी,श्रीशल्य कारंडे ,मुली शाळेच्या अध्यक्ष कोले, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे,गायकवाड ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, प्राध्यापक शशिकांत देशपांडे मान्यवर ग्रामस्थ यांच्या हस्ते सर्व मुलांना अंकलिपी व गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
पालकांमध्ये असलेले इंग्रजी माध्यमाचे आकषर्ण किती तकलादू असून जिल्हा परिषद मराठी शाळा नेहमी गुणवत्तेसाठी सरस असते हे शाळेतील शिक्षक चंद्रकांत वाघमारे, साळुंखे महानंदा यांनी आपल्या मनोगतामधून पालकांना पटवून दिले. तसेच समाधान देठे ,तोडकरी, सर्फराज काझी या पालकांनी देखील जिल्हा परीषद शाळा, भाळवणी ही गुणवत्तेत आघाडीवर असल्याचे मनोगतातून व्यक्त केले. इ. बा. मुलाणी गुरुजी, शशीकांत देशपांडे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पं. स. सदस्य विजय शिंदे यांनी शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षिका आवटे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीषा करांडे यांनी मानले.

