भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
पंढरपूर एसटी स्थानकातील गैरसोयीकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी कळविले आहे.
खरे तर शासन स्वच्छ बस स्थानक सुंदर बस स्थानक असे उपक्रम राबवित आहे.पंढरपूर हे महाराष्ट्र तील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी देशभरातून रोज हजारो भाविक भक्त येत जात असतात. त्यामुळे हे बस स्थानक कायम स्वरुपी सुंदर, स्वच्छ कसे राहील याकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही.
बस स्थानकाच्या आवारात बेवारस गाई बैलांचे थवेच्या थवे विखुरलेल्या अवस्थेत दिसून येतात, आवारात गाई बैलांच्या मल मूत्राचा जिकडे तिकडे सडा पडलेला आढळतो,प्रवाशी वर्ग जाता येता या शेण मूत्रात पाय घसरून पडतात, एसटी च्या चालकांना गाडी फलाटावर लावताना अडचणी येतात, एसटी स्थानकात दारुडे, गर्दुल्ले, भिकारी आश्रय घेऊन ऐसपैस वावरताना दिसतात,बाकावर झोपलेले आढळून येतात, स्थानकात उजव्या बाजूला बंद दुकानातून पाणी येऊन प्रवाशांच्या अडचणीत वाढ होते, ठिक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त विखुरलेला दिसून येतो, रिक्षा, चार चाकी वाहन, मोटार सायकल अशी खाजगी वाहने आवारात लावली जातात,
नियंत्रण कक्षाजवळ अधिकारी समोर बाहेरील खाजगी वाहन धारक प्रवासी आपल्या वाहना कडे घेऊन जातात, एसटी स्थानकातील पोलीस चौकीत पोलीस अथवा होमगार्ड कर्तव्यावर बसलेले दिसत नाहीत,प्रवाशी त्या चौकीत आपले मोबाईल चार्ज करतात, प्रवाशांना कोणाचेही बंधन राहिलेले नाही.रात्री भिकारी बाकावर झोपलेले असतात, त्या मुळे प्रवासी ताटकळत उभे असतात.
एकंदरीत येथील स्थानकात स्थानिक महामंडळाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते,आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी या स्थानकात फेरफटका मारला असता अनेक गैरसोयी कडे महामंडळाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.
सोलापूर येथील बस स्थानकावर मंत्री महोदय स्वतः भेट देऊन पाहणी करून तेथील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसाच प्रयत्न पंढरपूर येथील बस स्थानकास भेट देऊन मंत्री महोदय यांनी करावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.



