संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
संग्रामनगर ग्रामपंचायत आणि आकांक्षा लोकसंचालित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) सोलापूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.यानिमित्त आयोजित केलेल्या भव्य महिला बचत गट मेळाव्यात 'होम मिनिस्टर' आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली.
या कार्यक्रमासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते पाटील आणि अकलूज नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन पूजनाने करण्यात आले.यावेळीकार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या सौ.निशा गिरमे,संग्रामनगर ग्रामपंचायतीचे सरपंच अजित रेवंडे, उपसरपंच सुधीर रासकर,माजी सरपंच कमालभाई शेख,ग्रामसेवक, संग्रामनगर कोरबू साहेब,सुरेश दामु पवार,सिद्धेश्वर मारुती पिसे,तालुका व्यवस्थापक, निमंत्रीत प्रतिनिधी माविम जिल्हा कार्यालय सोलापूर रणजीत अंकुश शेंडे,तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे बक्षीस वितरणकार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या 'खेळ पैठणीचा' (होम मिनिस्टर) स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.विजेत्यांची नावे
अंबिका योगेश गरड प्रथम क्रमांक (पैठणी विजेती) सुजाता सोमनाथ ननवरे (द्वितीय क्रमांक),वैशाली सुनील कोळेकर (तृतीय क्रमांक) व इतर विजेत्या महिलांनाही उत्तेजनार्थ आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.
महिला उद्योजकता व भवनासाठी पुढाकार
यावेळी बोलताना सयाजीराजे मोहिते पाटील यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला.त्यांनी जाहीर केले की,महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत बचत गट भवन उभारण्याकरिता एक गुंठा जागेचे नियोजन करण्यात आले आहे.महिलांनी एकत्रित येऊन उद्योग-व्यवसाय उभारावेत.यासाठी संग्रामनगर ग्रामपंचायत नियमितपणे सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शासकीय योजनांचे मार्गदर्शन
तालुका व्यवस्थापक रणजीत शेंडे यांनी महिलांना आर्थिक सक्षमीकरण,सत्ता,संपत्ती आणि समाजात मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी 'माविम' आणि 'उमेद' अभियानामार्फत राबवल्या जाणाऱ्या ध्येय-धोरणांची सविस्तर माहिती दिली.तसेच उमेश जाधव यांनी महिलांना उपजीविकेच्या विविध संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकांक्षा लोकसंचालित साधन केंद्राचे सर्व कर्मचारी,व्यवस्थापक, क्षेत्र समन्वयक आणि सीआरपी (CRP) यांनी अथक परिश्रम घेतले.


