पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहरातील सर्वात मोठी गर्दी असलेल्या भादुलै हौद ते नवीन बस स्थानक बोहरी पैट्रोल पंपा मागील बाजूचा रस्ता छोटे, मोठे व्यापारी यांनी अतिक्रमीत (अतिक्रमण) केला आहे. त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा होत आहे. तरी योग्य ती कारवाई करून रस्ता रहदारीस तात्काळ सुरू करावा.असे निवेदन ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी नगर पालिका प्रशासनास दिले आहे.
छोटे मोठे व्यावसायिक विक्रेते यांना व्यवसाय करण्यास विरोध नाही. परंतु हा मार्ग सध्या भाजी विक्रेते दोन्ही बाजूचे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच असून वृध्द नागरीक महिला यांना भाजी घेताना त्रास होतो. शिवाय वाहनधारक, जनावरे यांचा उपद्रव ही मोठ्या प्रमाणात आहे. वाहनधारकांना, ग्राहकांना भाजी विक्रेत्यांनी लावलेल्या छत्र्या, बांबू तसेच मोकाट जनावरे याचाही त्रास होतो. रहदारीचा ताण कमी व्हावा.
पंढरपुर बसस्थानक ते महाराणा प्रताप चौक (सोमाणी पेट्रोल पंप) भादुले चौक-नाथ चौक-भजनदास चौक- तांबडा मारुती ते चंद्रभागा नदीकडे जाणारा हा रस्ता जिल्हाधिकारी यांनी यापुर्वीच एकेरी मार्ग म्हणून घोषित केलेला आहे. तसे नगरपालिका प्रशासनाला कळविलेले आहे, त्यामुळे हा मार्ग अतिक्रमण मुक्त असला पाहिजे.
तरी या मार्गावरून रहदारीस होणारा अडथळा दूर करावा तसेच भाजी विक्रेते छोटे व्यावसायिक यांची पर्यायी व्यवस्था होत असेल तर ती जरुर करण्यात यावी, येथे भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणात असून पूर्वापार लहान मोठे होलसेल, रिटेल धान्याची दुकाने आहेत. त्याचा धान्य इतर जिवनोपयोगी सामान घेऊन येणारी वाहने उभी राहिल्याने राहील्याने दोन्ही बाजूस विक्रेते बसलेले त्यामुळे नागरीकाना जीव मुठीत घेऊन भाजी घेण्यास फिरावे लागत आहे.तरी आपण यात जातीने लक्ष घालून रहदारीस अडथळा होणार नाही. विक्रेत्यांना भाजी विक्री करण्यासाठी सोय होईल अशी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.

