पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नगर वाचन मंदिर पंढरपूर येथे मंगळवार दिनांक 10/6/ 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी बंद पट्टे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी पत्रकार लखन साळुंखे उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सदस्य पा म अल्लापुरकर यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. यावेळी महाड येथील वाचक खास वाचनालयाशी भेट देण्यासाठी आले होते. तसेच पुणे येथील सुनील पांडे यांनी त्यांनी लिहिलेली 12 पुस्तके वाचनालयास भेट दिली व वाचनालय पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी वाचक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


