भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर,भाळवणी ता. पंढरपुर या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थीनी रचना पवन सातपुते हिने केंद्रीय नवोदय विद्यालय परीक्षा २०२५ - २६ उज्वल यश प्राप्त करत केंद्रीय नवोदय विद्यालय पोखरापूर या तिची ठिकाणी निवड झाली आहे.
याबद्दल संस्था अध्यक्ष कल्याणराव काळे साहेब,मार्गदर्शक बाळासाहेब काळे गुरूजी, संस्थेचे सचिव हनमंत जमदाडे ,संचालक मंडळ,प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे ,सर्व मार्गदर्शक शिक्षक व भाळवणी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व समस्त जागृत पालक वर्ग यांनी रचना पवन सातपुते हिस पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा संदेश देऊन अभिनंदन केले.

