कोणत्याही देशाची ओळख त्या त्या देशाच्या संस्कृती वरून होते. संस्कृती तेव्हाच जोपासली जाते जेव्हा ती प्रत्येकाच्या मनात भिनलेली असेल. मनात तेव्हाच भिनेल जेव्हा योग्य संस्कार केले जातील. विशेषतः बालवयात संस्कार होणे गरजेचे असते. आजचा उत्तम बालक उद्याचा उत्तम नागरिक होऊ शकतो आणि उत्तम नागरिकच उत्तम देश घडवू शकतो. म्हणून बालकांचे मन घडवणे महत्वाचे असते. कवीच्या बालवयात कवीचे आजी. आजोबा, आई वडील बालकविता , बडबड गीते सांगायचे , आई अंगाई गायची. त्यातून संस्काराची जोपासना केली जायची. काळ बदलत गेला
तसे माणसे ही बदलू लागली. तेव्हा बालके योग्य संस्कारापासून दुरावतील की काय अशी भीती वाटू लागली. बालमनावर बालकवितेतून संस्कार मिळतील या उद्देशाने डॉ.बालाजी मन्नाडे यांनी. ,"काँक्रीटच्या वनात " हा बालकविता संग्रह निर्माण.केला.आहे
वर्गात अध्यापन करताना ते बालकविता विद्यार्थ्यांना म्हणून दाखवत असे. तेव्हा त्यांच्या कविता विद्यार्थ्यांना आवडायच्या.मुलांच्या आग्रहाखातर त्यांनी बालकवितासंग्रह लिहला. ह्या बालकवितेत कल्पकता, तार्किकता जरूर आहे.पण बहुतांश वास्तवावर आधारलेला हा बाल कवितासंग्रह आहे. ओढूनताणून लिहण्यापेक्षा जे जे दिसले ते ते मांडले आहे. पूर्वीचा काळ आज राहिला नाही.काही कल्पना कालबाह्य होताना दिसतात. पर्यावरणाचा ऱ्हास, वृद्धाश्रम, जलप्रदूषण , वायूप्रदूषण, ध्वनीप्रदुषण , जगलाचा ऱ्हास , दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, प्राणी .पक्षी धोक्यात, भूगर्भ धोक्यात. इ. विषय घेवून बालमनावर उत्तम संस्कार होतील अश्या बालकवितांची निर्मिती केली आहे. जी आजच्या पिढीला कळणे गरजेचे आहे. संस्काराबरोबर मनोरंजन होईल याकडे ही लक्ष दिले गेले आहे. औद्योगीकरण,शहरीकरण हे गावकुसापर्यंत येऊन पोहचले आहे. जो तो वर वर बेगडी जीवनाला भुलत आहे. दया माया काहीच उरली नाही.माणसे पशू समान वर्तन करू लागले आहेत. प्राणी..पक्षी..यांची सर्रास कत्तल चालू आहे. हे पाहून मन सुन्न..सुन्न.. होते.हाती लेखणी येते आणि कोवळ्या मनावर संस्कार करणारी बालकविता निर्माण होते ते कळत देखील नाहीं.आणि यातूनच " काँक्रीटच्या वनात " हे शीर्षक ही ह्या बालकवितासंग्रहास मन्नाडे यांना सुचले आहे
लहान मुलांना सहज लक्षात राहतील अशी भाषा वापरली आहे. बाल कवितेत सर्रास चार कडवे वापरले आहे. जेणे करुन लहान मुलांना लवकर तोंडपाठ होईल.शब्दरचना सुलभ व सोपी वापरली आहे . लहान मुलांना पटकन लक्षात राहतील.
यात पक्षी,प्राणी, वृक्ष, विमान , पणी , पृथ्वी, हवा , ढेकूळ , माती , लाकूड , आभाळ , पर्यावरण , प्लॅस्टिक पिशवी , ट्रॅक्टर , आई , बाबा , शिकारी , माणसे , बिया , वने , गाव, भोंगा , आलिबाबा , फळे ,खेळ, भिकारी, ढग , पाऊस, जंगल , तळे, मळे ,शेतकरी , वेली दिवाळी, जादू, फवारा, जमीन, इ.घटकावर बालकविता लिहल्या आहेत.
ह्या बालकवितासंग्रहास इयता पाचवीच्या बालभारती पुस्तकात कठीण समय येता या पाठाचे लेखक मनोहर भासले सरांची. प्रस्तावना लाभली.आहे व मुद्रण व सजावट श्री.राहुल मुंडे यांचे यांनी केले.आहे
"काँक्रीटच्या वनात" हा बालकवितासंग्रह आजी,आजोबा,आई ,वडील, गुरुवर्य, शिक्षक ,विद्यार्थी, वाचक , साहित्यिक, कवी यांना खूपच आवडेल अशी अपेक्षा. हा बालकवितासंग्रह मुद्राई प्रकाशन मुबई येथून प्रकाशित झाला आहे.
लेखक - कवी सरकार इंगळी

