मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
शिक्षिका सुजाता मोहन जाधव यांना बृहन्मुंबई, उत्तर विभाग, यांच्यातर्फे स्वामी विवेकानंद स्कूल अँड ज्यु. कॉलेज चेंबूर येथे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यांच्या समवेत आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ता डॉ. पवन अग्रवाल हे देखील प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.
शिक्षिका जाधव यांनी शिक्षक अभ्यासक्रम मंडळ, एस.सी.ई.आर.टी., एन.सी.ई.आर.टी. बांच्या अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासक्रम विकास व शिक्षक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय, निष्ठावंत व परिणामकारक कार्यातून आपण नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस भरीव योगदान दिले.
शिक्षण क्षेत्रातील आपली तळमळ, अभ्यासपूर्ण दुष्टिकोन आणि जबाबदारीची जाणीवही सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल जाधव यांचे अभिनंदन केले जात आहे.

