भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
गतवर्षीप्रमाणे याही वर्षी घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेमध्ये भाळवणी विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे विद्यालयातील 378 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना फाउंडेशन तर्फे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे.
या परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी मासाळ गौरी सुधीर हिने पैकीच्या पैकी गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच हातगिने श्रेया राहुल, ऐवळे साक्षी लहू व शेवतेकर जान्हवी मोहन या विद्यार्थिनींनी सोलापूर जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे .
गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे प्रथम क्रमांकासाठी गोल्ड मेडल व तृतीय क्रमांकासाठी ब्राँझ मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. फाउंडेशन कडून शाळेसाठी सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी विभाग प्रमुख म्हणून नागणे एम. एस. व सहाय्यक म्हणून पवार व्हि.डी. यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक के डी शिंदे , उप मुख्याध्यापिका श्रीमती मोरे पर्यवेक्षक बेसिकराव आणि प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी बहुमोल असे सहकार्य केले.

