पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री संत शिरोमणी नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन या कार्यक्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठकीची सांगता पंढरपूर येथे संपन्न झाली.
यासाठी,आध्यात्मिक,शैक्षणिक ,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.त्यामध्ये प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,केंद्र सडक मंत्री नितीनजी गडकरी या कार्यक्रमांमध्ये लाखोच्या संख्येने नामदेव शिंपी समाज पोट जातींनीयुक्त येथे संघटनात्मक जमणार आहेत.
यामध्ये समाजाच्या विविध मागण्या आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांचे स्मारक आणि विविध विषयांवर संवाद होणार आहे.कार्यक्रमास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, प्रल्हाद जोशी,खा.प्रणीती शिंदे, संजय नहार,खा.अनिल बोंडे, संजय खोड़के,आमदार सुलभा खोड़के (अमरावती), आ. रविकुमार राणा (बडनेरा), नवनीतजी राणा,अभिनेते गोविंदजी नामदेव,ह.भ.प जितेंद्रनाथ म हाराज, स्वामी गोविन्दगिरी महाराज,सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज तसेच संपूर्ण भारतामधील सर्व जिल्ह्याचे खासदारआमदार, महापौर नगराध्यक्ष इतर उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या(महिला )सत्रात प्रमुख मान्यवरांमध्ये प्रणिती ताई शिंदे यांचाही उपस्थिती लाभणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे नियोजित नियोजन करत असताना, विविध ठिकाणी आढावा बैठका घेण्यात आल्या .भारतभर प्रचार करत असताना. सर्व पोट जातीतील समाज बांधवांसोबत भेटी झाल्या .त्यामुळे समाज घटकातील गरजा आणि त्यासाठी लागणारे समाजाचे संघटन किती महत्त्वाचे आहे. हे समजून आले. या कार्यक्रमाची सुरुवात नामदास महाराजांचा परिवाराच्या भेटी सोबत पहिली बैठक ही नामदेव मंदिर पंढरपूर येथे झाली.
आणि 14 फेब्रुवारी २६ रोजी चांडोलेवाडी हे शिंप्याच गाव आहे.त्या गावांमध्ये नामदेव महाराजाच्या मंदिराचा पायाभरणी करण्याचा योग आला ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्या सोबत मंदिर स्थापनेचा नारळ फोडण्याचे भाग्य आम्हा समाज मंडळींना मिळाले.योगायोगाने या कार्यक्रमाच्या दौऱ्याचा शेवट नामदेव मंदिर केशराजाच्या साक्षीने मंदिरात झाला.एक पर्वनी अशी झाली की ,केशी राजाला तुझ्या भक्ताच्या या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची विनंती करत असताना ,केशीराजाच्या गळ्यातील तुळशी माळेतील तुळशीचे पान खाली पडले.एक सांकेतिक आशीर्वाद म्हणून लडीवाळ भक्तासाठी केशीराजाने कौल दिला.देवाचा कृपाशीर्वाद पाहण्याचे साक्षीदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मीनल कुडाळकर,प्रश्विच महाराष्ट्र मुख संघटक संतोष मुळे, प्रश्विच महाराष्ट्र महिला अध्यक्ष शारदा जंजाळ, प्रश्विच महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.दिनकर पतंगे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय काकडे,आणि वाळवा तालुका महिला अध्यक्ष सुनिता औंधकर यांना हे भाग्य लाभले.हे दृश्य डोळ्यात पाणी आणणारे होते.हा सोहळा ऐतिहासिक होणारच आहे.याचे शिल्पकार अध्यक्ष भास्कर भाऊ टोम्पे ,समन्वयक अनंत जांगजोड,मुख्य संघटक ईश्वर भाऊ धिरडे,तर पश्चिम महाराष्ट्रात काम करणारे या विश्व महासंमेलनाच्या प्रदेशाध्यक्ष मीनल कुडाळकर पश्चिम महाराष्ट्र मुख संघटन संतोष मुळे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शारदा नामदेव जौंजळ, प्रश्विच महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.दिनकर पतंगे ,स्मरणिका प्रमुख अनिल खटावकर,सांगली जिल्हा उपाध्यक्ष सुभाष शिंगण, जनसंपर्क प्रमुख अरविंद चांडवले,त्याचबरोबर वाळवा तालुका अध्यक्ष सुनिता जंजाळ,राजश्री शिंगण,रेश्मा माळवदे,रूपाली जवंजाळ, सर्व ईश्वरपूर नगर मधील कै सुधाकर पिसे यांचा वारसा लाभलेला सर्व पदाधिकारी व समाज बांधव यांच्या सक्रिय सहभागाने तन-मन धनाने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे .तर एक आव्हान अजूनही वेळ गेलेली नाही तर मन धनाने आपण आपल्या समाज बांधवांसाठी एकत्रित यावे संघटित व्हावे.ही विनंती.
*मी समाजाचा*
*हा समाज माझा*
*!!चलो नागपूर ---*
*---चलो नागपूर!!*
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन २२ फेब्रुवारी २०२६

