भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील आनंद देशपांडे यांच्या घरी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुलाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ज्येष्ठ भक्त भीमाशंकर कारंडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी भजनकरी मंडळीचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुपारी 12 वाजता श्री राम जय जय राम जय जय राम च्या गजरात पुष्प वृष्टी करण्यात आली.
त्यानंतर भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील महिला भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

